पनवेल दि.१६(वार्ताहर): पनवेल परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह नव्याने होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूला असलेल्या खाडीमध्ये आढळला असून त्याच्या नातेवाईकाचा शोध पनवेल शहर पोलीस करत आहे.

सदर अनोळखी बेवारस पुरुष इसमाचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे, डोकयाचे केस काळे, डोळे उघडे व फुगलेले, तोंड उघडे असुन जीभ फुगीर बाहेर आलेली आहे. तर मिशी व दाढी साधारन वाढलेली असून अंगात काळ्या रंगाची पॅन्ट आहे. तसेच त्याची उंची अंदाजे ५ फुट ४ इंच आहे. या इसम बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ८५९१४२४३५० किंवा पोलीस उपनिरीक्षक सचिन वायकर यांच्याशी संपर्क साधावा.
