पनवेल शहरासह कळंबोलीतून रिक्षाची चोरी


पनवेल दि.१६(संजय कदम ):  पनवेल शहरासह कळंबोली वसाहती मधून रिक्षाची चोरी झाल्याची घटना घडल्याने रिक्षा चालकांमध्ये भीतीयुक्त वातावरण आहे.


 पनवेल शहरातील जुने पोस्ट ऑफिस परिसरात संतोष दाबके यांनी त्यांची रिक्षा उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर रिक्षा चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

तर दुसऱ्या घटनेत केशव टाकरस यांनी त्यांची रिक्षा कळंबोली बस डेपो जवळील रिक्षा स्टँडच्या बाजूला उभी करून ठेवली असता अज्ञात चोरटयाने  सदर रिक्षा चोरून नेल्याने याबाबतची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top