नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

नवी मुंबईत 25 ठिकाणी पोलिसांची छापेमारी ; 16 नायजेरियन नागरिकांना घेतले ताब्यात, 12 कोटींचे ड्रग्ज पोलिसांनी केले जप्त


पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः थर्टी फर्स्टच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल परिसराससह नवी मुंबईत 25 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवायांमध्ये 12 कोटींचे ड्रग्ज पोलिसांच्या हाती लागले आहे. याप्रकरणी 16 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे.


नवी मुंबईत ड्रग्ज विक्रेत्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. गतवर्षी खारघर येथे नायजेरियन व्यक्तींच्या अड्ड्यावर छापा टाकून थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्ये पुरवले जाणारे ड्रग्ज जप्त केले होते. त्यानुसार यंदाही थर्टी फर्स्टच्या अगोदरच पोलिसांनी ड्रग्ज विक्रेत्या टोळ्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची मोहीम राबवली.

पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकामार्फत ड्रग्ज विक्रीत सक्रिय असलेल्या नायजेरियन टोळ्यांची माहिती मिळवली होती.

त्याद्वारे गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांच्या पथकांनी एकाच वेळी परिमंडळ एक व दोनमधील विविध ठिकाणी छापे टाकले. तळोजा, खारघर, वाशी, कोपर खैरणे, नेरूळ,   परिसरात वास्तव्याला असलेल्या नायजेरियन व्यक्तींची झाडाझडती घेण्यात आली. त्यात 8 नायजेरियन व्यक्तींकडे एकूण 12 कोटींचे विविध प्रकारचे ड्रग्स मिळून आले, तर 8 नायजेरियन व्यक्ती बनावट कागदपत्रांद्वारे भारतात वास्तव्य करत असल्याचे समोर आले.

या एकूणच कारवाईत 16 नायजेरियन नागरिकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दीड वर्षांपूर्वी अशाच प्रकारे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालवणार्‍या नायजेरियन व्यक्तींवर सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यानंतर अनेकदा ठिकठिकाणी छापे टाकून ड्रग्ज विक्री करणार्‍या टोळक्यांचे कंबरडे मोडण्याचे काम पोलिसांमार्फत झाले आहे. त्यानंतरदेखील नायजेरियन व्यक्तींकडून शहरात छुपा आश्रय मिळवून ड्रग्ज विक्रीचे रॅकेट चालवले जात असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे. तसेच या कारवाई दरम्यान पासपोर्ट व व्हिसा संपलेल्या 73 ऑफ्रिकन नागरिकांना देश सोडून जाणेबाबतच्या नोटीसा अदा करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top