नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

तळोजा फेज १ मधील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा; कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी

पनवेल (4kNews) तळोजा फेज १ मधील आयशा हॉटेलने जागेची मर्यादा ओलांडत अनधिकृत बांधकाम केले आहे. या अनधिकृत बांधकामामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे सदरचे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे. त्या संदर्भात त्यांनी निवेदनही आयुक्तांना दिले आहे. 

    पनवेल महानगरपालिका हद्दीतील तळोजा फेज १ मधील सेक्टर ०२ मध्ये असलेल्या आकार रेसिडेन्सी येथे “आयशा” नावाने हॉटेल व्यवसाय सुरू आहे. सदर हॉटेल मालकाने अनधिकृत बांधकाम करून बाहेरील जागेत किचन, तसेच फुटपाथवरसुद्धा अनधिकृत काम केले आहे, त्याचबरोबरीने अवैधपणे स्वच्छतागृह उभारले आहे. तसेच नावाला हॉटेल व्यवसाय दाखवला जात असून सदर जागेचा वापर मदरसा म्हणून करत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत आणि त्याच अनुषगांने अनधिकृत बांधकाम संदर्भातील फोटो तसेच व्हीडीओ सुध्दा उपलब्ध झाले आहेत.

त्याचबरोबर यासंदर्भात तक्रारी करणाऱ्यांना हॉटेल मालकाकडून धमकावण्याचा प्रकार देखील होत आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महानगरपालिकेकडे केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top