सीकेटी महाविद्यालयात आंतर-महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धा

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज न्यू पनवेल (स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या समन्वयाने आंतर महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धा दिनांक  ५ व ६ मार्च  रोजी आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे सीकेटी कॉलेजचे प्राचार्य प्रो. डॉ. एस.के.पाटील यांच्या हस्ते झाले.



या स्पर्धेमध्ये ६ महाविद्यालयातील मुलींच्या ४ संघानी  व  मुलांच्या ६ संघांनी सहभाग नोंदविला आहे. आंतर महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये डी. जी. रुपारेल कॉलेज, माटुंगा, चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज, न्यू पनवेल, आर. ए. पोतदार कॉलेज, माटुंगा, विवेकानंद कॉलेज,चेंबूर, जी.एन. खालसा  कॉलेज , माटुंगा आणि पिल्लई कॉलेज, न्यू पनवेल इत्यादी महाविद्यालये सहभागी झाली आहेत.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईक, सहसंचालक प्रा. अनिल नाक्ती व प्रा. प्रतिज्ञा पाटील, जिमखाना विभागाचे सर्व सदस्य यांनी विशेष मेहनत घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top