चार वाहनांच्या अपघातात 3 जण जखमी
पनवेल, दि.6 (संजय कदम) ः पनवेल तालुक्यातील कोन गावाच्या हद्दीत आज झालेल्या चार वाहनांच्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

आज सकाळच्या सुमारास मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवर कि.मी.09/600 कोन गाव जवळ पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत यातील कंटेनर क्रमांक एनएल-01-एएच- 8598 यावरील चालक (नाव माहित नाही) हे किमी 09.600 पनवेल एक्झिट येथे थांबले होते,त्यांचे बाजूला एक अनोळखी वाहन थांबलेले होते,त्यावेळी ट्रक क्रमांक एमएच 50-0545 चालक नामे महेंद्र सिंग वय 50 वर्ष व क्लीनर योगेंद्र सिंग वय 22 वर्ष रा. कोचीन हे त्यांची गाडी चेक करण्यासाठी थांबले असता त्यांचे मागून येणारे कंटेनर क्रमांक एमएच 46 बीएफ 7145 वरील चालक नामे रवींद्र मंगल यादव वय 35 वर्ष, रा. आझमगड, उत्तर प्रदेश यांना पुढील वाहन अचानक दिसल्याने त्यांचे वाहना वरील नियंत्रण सुटून पुढील ट्रक क्रमांक एमएच 50 0545 याला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने,सदर वाहन पुढील अनोळखी वाहनावर व बाजूच्या एनएल 01-एएच 8598 या वाहनाला धडकून अपघात घडला,

सदर अपघातात चालक महेंद्रसिंग यांचे दोन्ही पायांना व चालक रवींद्र मंगल यादव यांचे पायाला, हाताला, पोटाला किरकोळ दुखापत तसेच क्लीनर योगेंद्र सिंग यांचे डोळ्याला, डोक्याला, चेहर्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना आयआरबी म्बुलन्स च्या मदतीने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

एनएल 01 एएच 8598 वरील चालक पळून गेलेला आहे. सदर ठिकाणी पनवेल तालुका पोलिसांचे पथक तसेच पळस्पे वाहतूक शाखेचे पथक उपस्थित राहून त्यांनी सदर अपघातग्रस्त वाहने आयआरबीच्या क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
