
नवीन पनवेल : शिवसेना पनवेल शहर प्रभाग क्र. १९ तर्फे वर्धापन दिनानिमित्त समाजहिताचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दगडी शाळा पनवेल येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप आणि पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करण्यात आले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना छत्र्या वाटण्यात आल्या, ज्यामुळे त्यांना सुरक्षित आणि सुलभ शालेय प्रवासासाठी मदत होईल. तसेच, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
हा उपक्रम शिवसैनिक राहुल केशव गोगटे यांच्या पुढाकाराने यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमात उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, शहर प्रमुख प्रसाद सोनवणे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
शिवसेनेचा वर्धापन दिन केवळ साजरा करण्यापुरता मर्यादित न ठेवता, तो समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न होता.

