नवीन बातम्या
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
OpenStation Blog: WordPress Has Been Missing This for 15 Years
Open Channels FM: Open Source Champions
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट

कामोठे येथे तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत भव्य आरोग्य शिबिर,मितेश जोशींच्या स्मरणार्थ  रविशेठ जोशी यांचा कामोठे येथे सामाजिक उपक्रम.

कामोठे, २७ जून,  (4K News)– कामोठे येथील सुप्रसिद्ध दानशूर व्यक्तिमत्व आणि भाजप कामोठे मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. रवीशेठ जोशी यांचा तरुण मुलगा, स्व. मितेश रवींद्र जोशी, यांचे कोरोना काळात  दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने कामोठे परिसर आणि जोशी कुटुंबावर शोककळा पसरली होती. मितेशच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि सामाजिक भान जपण्यासाठी, श्री. रवीशेठ जोशी दरवर्षी जनतेसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करतात. याही वर्षी, रवीशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट आणि साई द्वारका हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


हे महत्त्वाचे आरोग्य शिबिर रविवार, २९ जून २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मसाला मंत्रा हॉल, सेक्टर ३६, कामोठे येथे होणार आहे.
या शिबिरात नागरिकांना विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेता येणार आहे. यामध्ये जनरल फिजिशियन, दंत, हाडांचे आजार, स्त्रीरोग, तसेच कॅल्शियम कमतरता यांसारख्या समस्यांवर तपासणी उपलब्ध असेल. विशेष म्हणजे, शिबिरात डोळ्यांची मोफत तपासणी केली जाईल आणि गरजू रुग्णांना चष्मे वाटप देखील करण्यात येणार आहे.


आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या शारीरिक तपासण्यांमध्ये ई.सी.जी., रक्तदाब आणि आर.बी.एस. (साखरेची तपासणी) यांचा समावेश आहे. या तपासण्यांद्वारे नागरिकांना आपल्या आरोग्याची सद्यस्थिती जाणून घेता येईल.


यावेळी एका महत्त्वपूर्ण रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. रक्ताची वाढती गरज लक्षात घेता, नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या उदात्त कार्यात आपला सहभाग नोंदवावा, असे कळकळीचे आवाहन श्री. रवीशेठ जोशी यांनी केले आहे.


या शिबिराचा कामोठे आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
* श्री. नितीन कवडे – ९५९४४७४१४७
* श्री. जयेंद्र जोशी – 9967585181
* श्री. मनोज कवडे – ७९७७०४३९९१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top