नवीन बातम्या
केदार भगत यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त सुवासिक उटण्याचे वाटप उटण्याच्या पाकिटांवर ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’चा संदेश; रामशेठ ठाकूर यांनी केले कौतुक
Open Channels FM: Web Summit Gender In Tech Report Reveals Gaps in Tech Leadership, Pay, and AI for Women
साईनाथ पवार यांना मानद डॉक्टरेट पदवीसह ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव; पुण्यात दोन्ही सन्मान प्रदान
अनंत गीते यांच्या हस्ते शिवसेनेच्या दिवाळी सुगंधी उटण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ  उपनेते बबनदादा पाटील यांच्यासह पदाधिकारी, महिला आघाडी व शिवसैनिकांची उपस्थिती
डेरवली जिल्हा परिषद शाळेत आकाशकंदील कार्यशाळा उत्साहात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; पर्यावरणपूरक दिवाळीचा दिला संदेश
दुकानदारांच्या समस्या आणि महागाईच्या प्रश्नावर संघटना आक्रमक
कोल्हापूरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पनवेलच्या शिवसैनिकाचा मदतीचा हात
राहुल गोगटे यांच्या पुढाकाराने २०० जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
प्रशांत सोनवणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त १०० महिलांना साड्यांचे वाटप ९ नोव्हेंबरला जुने पनवेल येथे आयोजन; आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा स्वाभिमानी पुरस्काराने सन्मान
अखिला मेमोरियल ट्रस्टतर्फे आदिवासी बांधवांना दिवाळी भेट

सोन्याच्या चैनीची चोरी करून पसार झालेल्या चोरांना खांदेश्वर पोलिसांनी १२ तासाच्या आत केले गजाआड …

पनवेल दि.२७ (संजय कदम): पायी चालत जाणा-या पुरुष इसमाच्या गळयातील चैन चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांना खांदेश्वर पोलीस ठाणे कडून गुन्हा दाखल झाल्यापासून १२ तासाच्या आत जेरबंद करून गुन्हयातील १ लाख ६० हजार रू किंमतीचे सोन्याचे दोन चैनी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आहे.


         नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात होत असलेल्या चैन जबरी चोरीच्या गुन्हयाना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे व पोलीस सह आयुक्त संजय एनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त दिपक साकोरे तसेच पोलीस उपायुक्त सो, परि ०२, पनवेल प्रशांत मोहिते, सहा पोलीस आयुक्त भाउसाहेब ढोले यांनी वेळोवेळी सुचना केल्या होत्या, त्यानुसार सोन्याच्या चैनीच्या चोरीचा टॉप्स करत असताना खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चोरीच्या गुन्हयाच्या घटनास्थळी तात्काळ भेट देवून वपोनि स्मिता ढाकणे, पोनि (गुन्हे) सचिन परदेशी यांच्या सुचनेनुसार गुप्त बातमीदारांच्या प्राप्त माहीती वरून

आरोपी प्रेम संजय सोनवणे (वय २३ वर्षे, रा- मोहपाडा) आणि तकदिर राजेश साळुंखे (वय २२ वर्षे, नवनाथ नगर झोपडपट्टी, पनवेल) यांना नवीन पनवेल परिसरात, सापळा कारवाई करून शिताफिने ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. नमूद आरोपीताकडे केलेल्या

तपासात आरोपी कडून गुन्हयातील जबरीने चोरी करून नेलेले सोन्याचे चैनी असे एकूण १ लाख ६० हजार रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई खांदेश्वर पोलीस ठाणेचे सपोनि प्रताप बंडगर, पोउनि वणे, पोहवा उदय देसाई, पोहवा महेश कांबळे, पोहवा किसन पाटील, पोहवा धिरेंद्र पाटील, पोशि उत्तम शेंडे, पोशि सचिन पवार, पोशि स्वप्निल कोळी, पोशि संदीप तरटे, यांनी केली आहे. दरम्यान सदर गुन्हयाचा तपास पोउनि दत्तात्रय वणे कत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top