नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

रो्टरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डचे अध्यक्षपदी संजय रोकडे

मानसरोवर (प्रतिनिधी) : रो्टरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डच्या अध्यक्षपदी रो. संजय रोकडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. मानसरोवर कामोठे येथील अधिता बँक्वेट हॉलमध्ये शनिवारी (दि. १२) हा इन्स्टॉलेशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला



मावळते अध्यक्ष रो. स्वप्नील अग्रवाल यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्षपदाची सूत्रे संजय रोकडे यांनी स्वीकारली. याप्रसंगी सचिव म्हणून रो. डॉ. रविकिरण घोळे यांची निवड करण्यात आली.

या प्रसंगी सहाय्यक प्रांतपाल रो. लक्ष्मण पाटील, विशेष अतिथी रो. जीवन महालकर, क्लबचे सल्लागार डॉ. दीपक खोब, तसेच रो. राजेंद्र माने, डॉ. विकास शिंदे, अजिंक्य राणे, श्रीकांत पाटील, धर्मराज म्हेत्रे, प्रवीण वरे, संदीप बळीर आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनिर्वाचित अध्यक्ष संजय रोकडे यांनी आगामी काळात युवांना उद्योजकतेसाठी प्रेरित करणे, बिझनेस नेटवर्किंगच्या माध्यमातून समाज उपयोगी प्रकल्प राबवणे आणि समाजातील गरजूंपर्यंत अत्यावश्यक सेवा पोहोचवणे, असे विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच रो्टरीच्या मूल्यांचा प्रसार करत समाज उपयोगी सेवा प्रकल्प अधिक प्रभावीपणे हाती घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top