बुधवार दिनांक 29 /1/ 2025 रोजी लोकनेते दि.बा. पाटील विद्यालय कामोठे शाळेत दहावीचा निरोप समारंभ कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गौरव पोरवाल सर, प्रमुख पाहुणे मा. श्री. राम निरंजन शर्मा (रिटायर्ड सायंटिफिक ऑफिसर बी. ए. आर. सी), विद्यालयाचे चेअरमन मा. श्री. जयदास गोवारी साहेब, व्हाईस चेअरमन मा. श्री. विनायक म्हात्रे सर, मा.श्री. अद्वैत सर (राष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक), स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. गावंड सर, सर्व सेवक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थीनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गावंड सर यांनी केले, त्यानंतर नववीची विद्यार्थिनी श्रावणी रणनवरे,दहावीचे विद्यार्थी श्रेया कदम, पायल, रोहिणी कांबळे, श्याम राठोड या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री.फर्डे सर यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी खूप मेहनत घ्या,खचून न जाता पुन्हा उमेदवार उभे राहून यश संपादन करा, या पद्धतीने मार्गदर्शन केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यालयाचे चेअरमन श्री. जयदास गोवारी सर व बॉक्सिंग प्रशिक्षक श्री. अद्वैत सर यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री. राम निरंजन शर्मा सर यांनी येणाऱ्या खडतर प्रवासामध्ये आपण संकटांवर मात करून यश कसे संपादन करावे, त्याचबरोबर त्यांनी आपले सायंटिफिक ऑफिसर असताना जे काही अनुभव आले आहेत ते विद्यार्थ्यांना सांगितले व विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली .

शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.गौरव पोरवाल साहेब यांनी विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा व आपल्या शाळेचे व आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल करावे, येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे हा निरोप समारंभाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता म्हेत्रे, श्रुतिका जानकर, पूर्वा वाळुंज, विद्या गुंड, सलमा खातुर या विद्यार्थ्यांनी केले
.
