नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणार्‍या जितेंद्र म्हात्रेंना  राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!


पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः पनवेल तालुका पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्यावर असणार्‍या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र विठ्ठल म्हात्रे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलीस दलामध्ये प्रचंड  दबदबा असणारे अंमलदार म्हणून म्हात्रे यांची ओळख आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना पदक जाहीर करण्यात आले.


 रायगड पोलीस दलात जितेंद्र म्हात्रे भरती झाले. माणगाव खालापूर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रायगड अलिबाग, तसेच पोलीस मुख्यालय व त्यानंतर 2007 पासून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात गुन्हे शाखा , पनवेल तालुका पोलीस  खारघर त्यानंतर लागलीच पनवेल तालुका पोलीस ठाण्यामध्ये त्यांची बदली झाली. सध्या तेथेच ते कर्तव्यावर आहेत.  दरोडेखोर भिकू वाघमारेचा त्यांनी सामना करून अटक केल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे.

वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्यांनी अंमलदार म्हणून संबंधित अधिकार्‍यांची साथ केली. म्हात्रे यांना पोलीस दलातून रिवार्ड सुद्धा मिळालेले आहेत. त्यांना भारतीय 76 व्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top