पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांना कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी पनवेल विधानसभा क्षेत्र खारघर येथे युवासेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी युवासेनेकडून राज्य सचिव रुपेश पाटील, उपजिल्हा प्रमुख रोशन पवार, यूवासेना पनवेल विधानसभा अध्यक्ष क्षितिज शिंगरे, विधानसभा सचिव रोशन पुजारी, विधानसभा संघटक प्रतीक डोंगरे, खारघर शहर प्रमुख ओंकार वेदांते आणि युवासैनिक उपस्थित होते.
