नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थित आज तळोजात 10 कोटींचे अंमली पदार्थ करण्यात आले नष्ट


पनवेल, दि.26 (संजय कदम) ः महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत आज तळोजा 10 कोटींचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत.
विविध ठिकाणच्या कारवाईदरम्यान जप्त केलेल्या अंमली पदार्थाचा साठा नष्ट करण्याची कारवाई यंत्रणांकडून केली जाते.

नवी मुंबई पोलिसांनी विविध दाखल गुन्हयांत यापूर्वी सुमारे 10 कोटींचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केला असून सदरचा हा अंमली पदार्थांचा साठा नवी मुंबई पोलिसांकडून आज बुधवार दि.26 फेबु्रवारी रोजी नष्ट केला. यावेळी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर व नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तळोजा एमआयडीसी प्लॉट नं-पी-32 येथे मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेडच्या भूखंडावर हा अंमली पदार्थ नष्ट करण्याचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई, दिपक साकोरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई, प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2, पनवेल, अजय लांडगे, गुन्हे शाखा, नवी मुंबई, तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि प्रवीण भगत आदींसह इतर पदाधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top