पनवेल, दि.19 (संजय कदम) ः तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यामध्ये जप्त केलेल्या एकूण 10 वाहनांचा जाहीर लिलाव दि.21 मार्च 205 रोजी सकाळी 11 वाजता ठेवण्यात आला आहे.

सदर वाहनांमध्ये लाल रंगाची बजाज स्कुटी, लाल व काळ्या रंगाची बजाज पल्सर मोटार सायकल, काळ्या रंगाची मारुती ईस्टीम कार, होंडा सिटी कंपनीची सोनेरी रंगाची कार, टोयॉटो स्टीओस कार, स्कोडा कार, चॉकलेटी रंगाचा टेम्पो, रिटस् मारुती कार, काळ्या पिवळ्या रंगाची ऑटो रिक्षा व सोनेरी रंगाची फियाट कार अशा 10 वाहनांचा जाहीर लिलाव तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात येणार असल्याची माहिती वपोनि प्रवीण भगत यांनी दिली आहे.
