नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

सरगम लायन्स तर्फे फडके विद्यालयात नेत्र तपासणी शिबिर

सरगम लायन्स तर्फे फडके विद्यालयात नेत्र तपासणी शिबिर
लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे नुकतेच आयरिस नेत्र रुग्णालय आणि एस पी मोरे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स यांच्या सहकार्याने आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल येथे मराठी आणि इंग्रजी माध्यमातील प्री प्रायमरी पासून उच्च माध्यमिक वर्गातील सुमारे 1800 विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.

या शिबिरामध्ये डॉ. मानसी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने नेत्र तपासणी, रंग आंधळेपणा तपासणी सुध्दा करण्यात आली.


दोन दिवस चाललेल्या या शिबिराला प्रांतपाल एन आर परमेश्वरन, जी एस टी चेअरमन विजय गणात्रा, रिजन चेअरमन सुयोग पेंडसे, झोन चेअरमन अल्केश शहा, एक्झिक्युटिव्ह डि. कॅब. सेक्रेटरी संजय गोडसे यांनी भेट दिली.


ज्या मुलांना डोळ्याच्या समस्या जाणवल्या त्यांना डॉ. मानसी मोरे यांनी मार्गदर्शन केले.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सरगम क्लबच्या अध्यक्ष मानदा पंडित, स्वाती गोडसे, संध्या महानुभाव, आदित्य दोशी, मिलिंद जोशी, जयेश मणियार, एस पी मोरे कॉलेज चे सतीश मोरे तसेच फडके विद्यालयाच्या शिक्षक आणि कर्मचारी वर्गाने खूप मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top