पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः जखमी इसम उपचारादरम्यान मयत झाल्याने व त्याच्या कुटुंबियांचा कुठलाही ठाव ठिकाणा नसल्याने याबाबत पनवेल शहर पोलिसांच्या मार्फत त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे.

आशिष सिंग (पूर्ण नाव माहित नाही) असे या इसमाचे नाव असून तो भंगार गोळा करण्याचे काम करत असे. त्याच्यावर माया बार समोरील रोडवर हल्ला होवून त्या तो गंभीर जखमी झाला होता.

व उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत पुढील तपास सपोनि प्रकाश पवार करीत असून या संदर्भात कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा सपोनि प्रकाश पवार मो.नं.9923798789 येथे संपर्क साधावा.
