पनवेल दि. ११ ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील साईकृपा धाब्याच्या समोर सर्व्हिस रोडवर ट्रक मध्ये झोपलेल्या इसमाच्या मोबाईलची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना घडली आहे .

विशाल कुमकर ( वय ३३ ) हे ट्र्क मध्ये झोपलेले असताना कोणी तरी अज्ञात चोरट्याने त्याच्या खिशातील ८ ,००० रुपये किमतीचा विवो कंपनीचा फोन चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
