पनवेल, दि.5 (4kNews) ः कळंबोली वाहतूक शाखेच्या हद्दीत जड अवजड वाढत्या वाहनांचे संख्येमुळे पार्कीगची समस्या निर्माण होत असून सदर वाहनांचे पार्कींग करीता जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही वाहन चालक हे त्यांची वाहने कळंबोली लोखंड व पोलाद बाजाराचे हद्दीतील सेवा रस्त्यावर ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी पार्क करीत आहेत. त्यामुळे सदर मार्गावर सकाळ व संध्याकाळचे वेळेस इतर वाहनांचे वाहतूकीकरीता कमी लेन उपलब्ध होत असल्याने वाहतूक कोंडी होत असलेबाबत मल्टीमेडीया तसेच व्टिटरव्दारे तक्रारी या तसेच वरिष्ठ कार्यालयात प्राप्त होत आहेत. तसेच त्याबाबत वर्तमानपत्रात देखील बातम्या प्रसिध्द झालेल्या आहेत.

सदर मार्गावर जड अवजड वाहनांचे पार्कीगंमुळे वाहतूक कोंडी होणार नाही याकरीता दिनांक 04.12.2024 रोजी पोनि, हरीभाउ बानकर यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि, साठे व पथक यांनी जड अवजड वाहतूकदार यांची कॉर्नर बैठक बिमा नाका या ठिकाणी घेतली.

सदर मार्गावर जे वाहनचालक दुस-या व तिस-या लेनमध्ये वाहने पार्क करतील त्यांचेवर मोटार वाहन कायदयान्वये कारवाई करण्यात येत आहे परंतू वाहने पार्कंगची संख्या कमी होत नसल्याने सदर वाहनचालकांवर भारतीय न्याय संहिता कलम 285 अन्वये कारवाई सुरू करण्यात आलेली असल्याचे समक्ष सांगितले आहे.

तसेच यापुढे लोखंड व पोलाद बाजाराचे मुख्य सेवा रस्त्यावर दोन्ही बाजुस दोन तसेच तीन लेनमध्ये वाहने पार्क करू नयेत, वाहतूक पोलीसांनी दिलेल्या सुचनांचे व नियमांचे पालन करावे याबाबत माहिती देण्यात आली अन्यथा प्रचलित कायदयान्वये कारवाई करण्यात येईल अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत.
