पनवेल, दि.5 (4News) ः शिरढोण येथील सेफएक्सप्रेस कंपनीतून कोणास काही एक न सांगता एक इसम कुठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

राजा संजय सिंग (33) असे या इसमाचे नाव असून, रंग गोरा, उंची 5 फुट 7 इंच, बांधा मजबूत, चेहरा उभट, डोक्याचे केस काळे असून, अंगात हाफ ब्राऊन रंगाचा टी-शर्ट व हाफ पॅन्ट तसेच पायात काहीही नाही.

तो मैथिली भाषा बोलतो. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी क्र.0227452333 किंवा सहा.पोनि.जयेंद्र माने मो.नं.8108899595 येथे संपर्क साधावा.
