पनवेल, दि.5 (वार्ताहर) 4kNewsः पैसे लुटण्याच्या बहाण्याने एका इसमास मारहाण केल्याची घटना पनवेल शहरात घडली असून या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

मोहम्मद अल्ताफ मो.समशेर शेख याच्याकडे भंगार गोळा करणारे आशिष सिंग व त्याच्या सोबत असणारा त्याचा मित्र असे माया बारच्या समोरील रोडवर असताना आरोपी बाबू वाघमारे व त्याच्या इतर मित्रांनी आपसात संगनमत करून पैसे लुटण्याच्या उद्देशाने या दोघांना अडवून त्यांना मारहाण करून जखमी केले.

तसेच कोणत्या तरी हत्याराने आशिष यास मारहाण केली व गंभीर दुखापत केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने या गुन्ह्यातील आरोपी बाबू वाघमारे व त्याचा एक साथीदार यांना ताब्यात घेतले आहे.
