नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार अजित पाटील

4k समाचार
उरण दि 18 (विठ्ठल ममताबादे )राजकारणाच्या दृष्टीकोणातून उरण तालुका अत्यंत महत्वाचा समजला जातो अशा या महत्वाच्या उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी उरण तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक झुंजार मतचे संपादक अजित पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकरभाऊ घारे आणि कार्याध्यक्ष अशोकराव भोपतराव यांच्या प्रमुख उपस्थितीत रानसई येथे झालेल्या उरण पनवेल तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या समन्वय बैठकीत या पदांचे पत्र जिल्हाध्यक्ष सुधाकरभाऊ घारे यांच्या हस्ते देण्यात आले .यावेळी व्यासपीठावर प्रदेश चिटणीस मनोज भगत , कोकण संघटक रुपेश पाटील , उरण तालुका अध्यक्ष परिक्षीत ठाकूर , तेजस डाकी आदी मान्यवर उपस्थित होते.  

यावेळी जिल्हा सरचिटणीस पदावर दिपक माळी यांची रायगड जिल्हा उपाध्यक्ष भूषण ठाकूर, उरण तालुका ओ बी सी सेले अध्यक्ष  मच्छिंद्रनाथ ठाकूर, रायगड जिल्हा सरचिटणीस  रमण कासकर, उरण विधानसभा सरचिटणीस  निलेश पाटील आदींच्या निवडी देखील जाहीर करण्यात आल्या. यावेळी पनवेल तालुक्यातील उबाठा सेनेचे उपतालुकाप्रमुख विठ्ठल मुंगाजी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांना पक्षाचे उपरणे घालून जिल्हाध्यक्षांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे . 

या छोटेखानी कार्यक्रमात बोलताना जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी आगामी निवडणुकीच्या निमित्ताने अजून तरी युती आघाडीचा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही.त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या प्रत्येक वॉर्ड मध्ये आणि नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे करण्याची तयारी करण्याचे संकेत कार्यकर्त्यांना दिले आहे. यावेळी चिरनेर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते संतोष ठाकूर , तालुकाध्यक्ष परिक्षीत ठाकूर , रमण कासकर , तेजस डाकी , रूपेश पाटील आदींची ही समायोचित भाषणे झाली तर आभार मनोज भगत यांनी मानले. जेष्ठ पत्रकार अजित पाटिल यांची उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top