4k समाचार
ऐरोली, दि. ११ (वार्ताहर) : ऐरोली सेक्टर १७ येथील दत्त मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दोन दानपेट्या फोडून अंदाजे १५ ते २० हजार रुपयांची रोकड चोरली. सकाळी मंदिर उघडताना हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी नागरिकांनी तत्काळ रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीसांच्या प्राथमिक अंदाजानुसार ही घटना रात्री अडीच ते चार वाजेच्या दरम्यान घडली असावी. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
