4k समाचार
पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट *आमदार मा. श्री. प्रशांत दादा ठाकूर साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे, कामोठेकरांच्या सुरक्षेशी संबंधित बर्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला एक महत्त्वाचा प्रश्न — कामोठे शहरासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र — अखेर मार्गी लागला आहे.

सेक्टर ३२, प्लॉट क्रमांक ५ ही जागा अग्निशमन दलासाठी अधिकृतपणे आरक्षित* करण्यात आली आहे. हा निर्णय म्हणजे कामोठेकरांच्या सुरक्षेसाठी उचललेले एक भक्कम पाऊल असून, आपत्कालीन परिस्थितीत मदत अधिक तत्पर होणार आहे.

या कामाची निविदा तातडीने काढून, कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्याची विनंती देखील आयुक्त साहेबांकडे करण्यात आली आहे, जेणेकरून हा उपक्रम लवकरच वास्तवात उतरेल.

त्यानिमित्त पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. मंगेश चितळे साहेब यांचा कामोठे मंडलाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला या प्रसंगी *माझे सहकारी नगरसेवक श्री. विजय चिपळेकर, समाजसेवक श्री. प्रदीप भगत आणि समाजसेवक श्री. रवी गोवारी* यांची उपस्थिती लाभली.

या दूरदृष्टीपूर्ण निर्णयासाठी आणि सहकार्याबद्दल, पनवेल महानगरपालिका, मा. श्री. मंगेश चितळे साहेब आणि आमदार मा. प्रशांत दादा ठाकूर साहेब यांचे मनःपूर्वक आभार!
