नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

ग्रुप ग्रामपंचायत दूंदरे वतीने ५ शाळांना साहित्य वाटप


पनवेल / प्रतिनिधी 4kNews:- ग्रुप ग्रामपंचायत दूंदरे  शुक्रवार दि ५ डिसेंबर रोजी सरपंच सुभाष भोपी यांच्या नेतृत्वाखाली मासिक सभा ग्रामपंचायत दूंदरे कार्यलयात पार पडली या मिटिंग मध्ये दुंदरे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गावातील नागरिकांचे विविध विविध प्रश्नांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली


ग्रामपंचायत मीटिंग नंतर रिटघर येथे दुंदरे हद्दीतील रिटघर, दूंदरे, दूंदरेपाडा, चिंचवली, शिवनसई, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना शाळेला आवश्यक असणारे साहित्य खुर्च्या, टेबल कपाट सरपंच उपसरपंच सदस्य कमिटीच्या उपस्थित शिक्षक दूंदरे ३ टेबल ५ खुर्च्या १ कपाट,१ ग्रंथालय तर रिटघर शाळेला ३० खुर्च्या, १ कपाट, १ ग्रंथालय कपाट, दूंदरे पाडा, चिंचवली,शिवणसई या प्रत्येक शाळेला शाळेला २ टेबल ५ खुर्च्या १ग्रंथालय कपाट, शाळांना सुपूर्द केले.


यावेळी शिक्षकांनी  आपले मनोगत मांडत ग्रामपंचायत दुंदरे सरपंच सुभाष भोपी व कमिटीचे आभार मानले.
सरपंच सुभाष भोपी यांनी ही शिक्षकांना मार्गदर्शन करत लवकरच शाळेंना शुद्ध पाण्यासाठी एक्वागार्ड देणार असल्याचे सांगितले. तसेच ग्रामपंचायत उपसरपंच व महिला सदस्य प्रत्येक शाळेत भेट देणारा असून मुलींची संवाद साधणार आहेत.


या कार्यक्रमाला  उपस्थित सरपंच सुभाष पुंडलिक भोपी,
उपसरपंच शितल कैलास भोपी तसेच सदस्य महेश महादू पाटील, कमला लहू वाघमारे
शांताराम शंकर चौधरी,प्रलय तुकाराम भोपी,करमेलकर सुप्रिया हनुमान, ललिता संतोष चौधरी,राणी विलास सिनारे जयदास मारुती चौधरी, विश्वास पुंडलिक पाटील
शकुंतला भीमा गोसावी आदी सदस्य ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब सरडे रायगड भूषण भूषण भोपी आणि ग्रामस्थ मंडळी शिक्षक वृंद उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top