नवीन बातम्या
उरण नगरपरिषदेत वारस हक्काने १९ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती. २ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांच्या प्रयत्नामुळे मार्गी.
*सरगम लायन्स तर्फे तळोजा प्राथमिक शाळेत वाचनालय*
अभिनेते विकास वायाळ यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या महाराष्ट्र प्रवक्तापदी निवड
क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांचा रोटरीतर्फे सन्मान
शिक्षक-पालक संघाची स्थापना; मानसी कोकीळ, मनीषा पाटील अध्यक्ष
पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
सिडको अग्निशमन केंद्र खारघर  रेस्क्यू  वर्दी
संतोष पवार यांची पनवेल शहर जिल्हा काँग्रेस एससी विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन

पनवेलच्या नितळस परिसरात बिबट्याचा वावर
आमदार प्रशांत ठाकूर यांची तहसीलदारांकडे उपाययोजनेची मागणी



4k समाचार दि. 14
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील नितळस गाव परिसरात अलिकडच्या काही दिवसांत बिबट्याच्या हालचाली, त्यांच्या उपस्थितीची चिन्हे आणि संचारकाळातील दृश्ये समोर आली आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त पाहणी व स्थळभेट आयोजित करून या विषयावर प्रभावी नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 


  या निवेदनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे की, नितळस गाव परिसरात नागरिकांची सुरक्षितता, जंगल क्षेत्रातील नियंत्रण तसेच बिबट्याला विनाव्यत्यय सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविणे अत्यंत आवश्यक झाले आहे. या अनुषंगाने वन विभाग, महापालिका व पोलीस विभाग यांच्यात समन्वय होणे आणि प्रत्यक्षस्थळी संयुक्त पाहणी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपण संबंधित वन विभाग अधिकारी पोलीस अधिकारी व स्थानिक प्रशासनासोबत प्रत्यक्षस्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा. 

नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती मार्गदर्शक सूचना देऊन योग्य ती उपाययोजना तातडीने राबवावी, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदनात म्हटले आहे. बिबट्याचा वावर लक्षात घेता परिसरात रात्रीच्या वेळी गस्त वाढविणे, नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविणे, आवश्यक तेथे पिंजरे व तांत्रिक साधनांची उपलब्धता तसेच हेल्पलाइन व सूचना प्रणाली मजबूत करणे आवश्यक असल्याचेही तहसीलदार मिनल भामरे यांना दिलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top