नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

एनडीएच्या भव्य विजयाने पनवेल दुमदुमले; फटाक्यांची आतषबाजी व मिठाई वाटप


  4k समाचार   दि. 15  पनवेल

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएने मिळवलेल्या भव्य विजयाचा देशभरात जल्लोष होत असताना त्याचे प्रतिबिंब पनवेलमध्येही दिसले. भाजप मध्यवर्ती कार्यालय व आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त आनंद व्यक्त केला. 

बिहारमधील विजयाची बातमी समजताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि एनडीएच्या जयघोषांनी परिसर दुमदुमवला. कार्यालयाबाहेर मिठाई वाटप करून कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला. बिहार एनडीएच्या विजयाचा उत्साह पनवेलमध्ये दिवसभर जाणवून येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top