नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

जेबीएसपीचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांची वंदे मातरम 150 व्या वर्धापनदिन शासकीय तालुकास्तरिय समितीवर नियुक्ती


4k समाचार   दि. 15
पनवेल (प्रतिनिधी) बंकीमचंद्र चटटोपध्याय यांनी सन 1857 साली लिहिलेले वंदे मातरम या गीतास स्वातंत्र्य लढयात तसेच स्वातंत्रोत्तर कालखंडातही अनन्ययाधारण महत्व प्राप्त आहे. आनंदमठ या कादंबरीतील हे गीत भारतमातेच्या स्तृतीचे प्रतीक असून, स्वातंत्र्य लढयातील असंख्य क्रांतीकारकांना प्रेरणादायी ठरलेले आहे. या गीतास दिनांक. 07 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण होत आहे.त्यानिमित्ताने शासन निर्णयानुसार, राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनाचे यशस्वी आयोजनासाठी अपर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरिय समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षण संस्था प्रतिनिधी म्हणून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख तसेच पत्रकार म्हणून  ज्येष्ठ पत्रकार संजय कदम नियुक्ती करण्यात आली आहे. 


 या कमिटीमध्ये अप्पर तहसीलदार जितेंद्र इंगळे हे अध्यक्ष, गटविकास अधिकारी समीर वाठारकर सदस्य,  कौशल्य विकास सहा.आयुक्त मोहसीन वस्ता, गटशिक्षणाधिकारी शाहू सकपाळ, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पिल्ले सर, महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे प्राधिकृत प्रशिक्षण संस्था, प्रतिनिधी योगेश पाटील, अध्यक्ष व ज्योती लोहार सचिव, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे, शिक्षण संस्था प्रतिनिधी म्हणून वाय.टी.देशमुख व राजेंद्र पालवे, संत श्रीकांत महाराज मोहोकर, क्रीडापटू प्रसाद ढवळे, विवेक सावंत, 

साहित्यिक गणेश म्हात्रे, सुनिता खरे, पत्रकार संजय कदम, आप्पासाहेब मगर, गडकिल्ले संवर्धन समिती सदस्य सागर मुंढे, प्रतिक चाचड, उद्योजक प्राग्वंश पाटील, संदीप मोहिते, महिला बचत गट प्रमुख अंजली इनामदार, स्वाती पवार, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी जाणीव एक सामाजिक संस्था, पनवेल, जागृती मित्र मंडळ, केदार भगत मित्र मंडळ व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विजय टिकोले यांचा समावेश या समितीमध्ये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top