नवीन बातम्या
केदार भगत यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त सुवासिक उटण्याचे वाटप उटण्याच्या पाकिटांवर ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’चा संदेश; रामशेठ ठाकूर यांनी केले कौतुक
Open Channels FM: Web Summit Gender In Tech Report Reveals Gaps in Tech Leadership, Pay, and AI for Women
साईनाथ पवार यांना मानद डॉक्टरेट पदवीसह ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव; पुण्यात दोन्ही सन्मान प्रदान
अनंत गीते यांच्या हस्ते शिवसेनेच्या दिवाळी सुगंधी उटण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ  उपनेते बबनदादा पाटील यांच्यासह पदाधिकारी, महिला आघाडी व शिवसैनिकांची उपस्थिती
डेरवली जिल्हा परिषद शाळेत आकाशकंदील कार्यशाळा उत्साहात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; पर्यावरणपूरक दिवाळीचा दिला संदेश
दुकानदारांच्या समस्या आणि महागाईच्या प्रश्नावर संघटना आक्रमक
कोल्हापूरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पनवेलच्या शिवसैनिकाचा मदतीचा हात
राहुल गोगटे यांच्या पुढाकाराने २०० जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
प्रशांत सोनवणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त १०० महिलांना साड्यांचे वाटप ९ नोव्हेंबरला जुने पनवेल येथे आयोजन; आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा स्वाभिमानी पुरस्काराने सन्मान
अखिला मेमोरियल ट्रस्टतर्फे आदिवासी बांधवांना दिवाळी भेट

महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन सल्लागार समितीवर बाळासाहेब तुकाराम भुजबळ यांची शासनाकडून नियुक्ती

4k समाचार
उरण दि २3 (विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र शासनाच्या वतीने किमान वेतन सल्लागार समिती घोषित केली असून सदर समितीवर कामगार प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब तुकाराम भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 



कामगार क्षेत्रात भारतीय मजदूर संघ  माध्यमातून शिरवळ, शिरूर, मावळ, रायगड जिल्ह्यातील संघटित,असंघटित क्षेत्रात बाळासाहेब तुकाराम भुजबळ हे गेली २७ वर्षापासून संघाच्या वतीने काम करीत आहेत. औद्योगिक क्षेत्रातील पुणे  जिल्ह्य़ातील विविध ठिकाणच्या  कंपन्यांमध्ये कामगारांचे वेतनवाढ करार ,  कामगारांवर होणारे अन्यायाला वाचा फोडण्या करिती आंदोलन त्यांनी केलेले असून पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे, विविध हॉस्पिटल तसेच विविध कॉलेज, व शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आंदोलने केली आहेत. असंघटित क्षेत्रातील हंगामी फवारणी कर्मचारी या संघटनेचे ते प्रदेश अध्यक्ष म्हणून सध्या ते कार्यरत असून भारतीय मजदूर संघाच्या विविध जबाबदारी त्यांनी सांभाळलेल्या असून सध्या ते भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे संघटन मंत्री म्हणून कार्यरत आहेत.



असंघटित क्षेत्रातील तसेच विविध उद्योगात काम करणाऱ्या कायम, कंत्राटी/रोजंदारी अथवा डेली वेजेस वर काम करणाऱ्या लाखो कामगारांचे वेतन निश्चित करण्यासाठी शासनाची किमान वेतन सल्लागार समितीवर काम करणार असून तसेच वीज उद्योगातील, मेट्रो उद्योगातील कामगारांसाठी स्वतंत्र वेतनश्रेणी करिता शोषित पीडीत व वंचित कामगारांना चांगल्या प्रकारे जीवनमान जगता यावे याकरिता त्यांना चांगले किमान वेतन मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती बाळासाहेब भुजबळ यांनी दिली. 

या वेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व पुणे भारतीय मजदूर संघ अध्यक्ष अर्जुन चव्हाण,  सचिव सागर पवार यांनी अभिनंदन प्रस्ताव पारित करण्यात येवुन सर्व सामान्य कामगारांपर्यंत किमान वेतनच नाही तर जीवन वेतन मिळवे अशी अपेक्षाच अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली आहे .  शासनाने व भारतीय मजदूर संघाने या मंडळावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल  बाळासाहेब भुजबळ यांनी उभयंताचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top