नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

पनवेलचा ओंकारेश्वर आगमन सोहळा संपन्न श्री.प्रितमदादा म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती



पनवेल : 4k समाचार दि. 25
   गणेशोत्सवाची पर्वणी म्हणजे भक्ती, उत्साह, एकोपा आणि आनंदाचा महापर्व. त्याचाच भाग म्हणून ओंकार मित्र मंडळ, प्रभू आळी, पनवेल आयोजित ३५ वा गणेश आगमन सोहळा शनिवार दि. २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता दिमाखदार व भक्तिरसात संपन्न झाला.  


यंदा मंडळाने बाप्पाचे श्रीकृष्णस्वरूपातील आगमन करून पनवेलकरांसाठी खास आकर्षण निर्माण केले. संपूर्ण प्रभू आळी परिसर फुलांच्या सजावटीने, रोषणाईने व ढोल-ताशांच्या गजराने नटला होता. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले. या आगमन सोहळ्यास मंडळाचे आधारस्तंभ प्रितमदादा म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे मंडळ समाजकार्य आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत असून, पनवेलमध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीबरोबर समाजसेवेचा संदेश देत आहे. मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि स्वयंसेवक यांच्या  कुशल नियोजनामुळे सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.महिला मंडळ व सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.



समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा
मागील ३५ वर्षांपासून ओंकार मित्र मंडळ धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक कार्यालाही प्राधान्य देते.
बाप्पासाठी हार-फुलं न आणता “एक वही – एक पेन” ही संकल्पना राबवली जाते. जमा झालेली शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना दिली जातात. दरवर्षी अनाथाश्रमांना भेट देऊन अन्नदान करण्याचा उपक्रमही राबवला जातो. प्रितमदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम व इतर सामाजिक उपक्रम सातत्याने सुरू आहेत अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष निखिल राम फडतरे यांनी दिली. या मंगलमय सोहळ्यात श्री.प्रितम म्हात्रे यांनी सपत्नीक सौ. ममता म्हात्रे यांच्यासह उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top