नवीन बातम्या
उरण नगरपरिषदेत वारस हक्काने १९ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती. २ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांच्या प्रयत्नामुळे मार्गी.
*सरगम लायन्स तर्फे तळोजा प्राथमिक शाळेत वाचनालय*
अभिनेते विकास वायाळ यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या महाराष्ट्र प्रवक्तापदी निवड
क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांचा रोटरीतर्फे सन्मान
शिक्षक-पालक संघाची स्थापना; मानसी कोकीळ, मनीषा पाटील अध्यक्ष
पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
सिडको अग्निशमन केंद्र खारघर  रेस्क्यू  वर्दी
संतोष पवार यांची पनवेल शहर जिल्हा काँग्रेस एससी विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन

कळंबोलीत पर्यावरणस्नेही हळदी कुंकू!


पनवेल/ प्रतिनिधी:- सध्या ठीक ठिकाणी हळदी कुंकू समारंभ आयोजित केले जातात. विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, निवडणुकीसाठी असलेले इच्छुक उमेदवार याकरता अग्रभागी असतात.

त्याचबरोबर विविध गृहनिर्माण संस्थांमध्येही हा कार्यक्रम पार पडतो. शनिवारी कळंबोली सेक्टर 14 येथील आशीर्वाद सोसायटीमध्येही सुहासिनींच्या जिव्हाळ्याचा हा उपक्रम पार पडला. विशेष म्हणजे यावेळी सहभागी झालेल्या महिला भगिनींना संक्रांत वाण म्हणून तुळशीचे रोप देऊन एक प्रकारे पर्यावरण स्नेही संदेश देण्यात आला.



नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण ‘मकर संक्रांत’ होय. सुगड पुजण्यापासून पुढील १५ दिवस हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरू होतात. पण, सगळ्याच महिलांना उत्सुकता असते की, हळदी कुंकवाला वाण म्हणून कोणती वस्तू मिळणार. यासाठी आयोजकांच्या वतीने वेगवेगळे पर्याय शोधले जातात. मात्र कळंबोलीतील आशीर्वाद सोसायटीच्या महिला आयोजकांनी हळदी कुंकू समारंभामध्ये सहभागी झालेल्या सुहासिनींना तुळशीचे रोप देऊन ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा एक पर्यावरणपूरक संदेश दिला.


तुळशीचे रोप भारतात जवळपास प्रत्येक घरात आढळते. ग्रामीण भागामध्ये तर तुळशी वृंदावन घरासमोर असते. या पवित्र वनस्पतीला केवळ आरोग्य लाभच नाही तर हिंदू संस्कृतीतही खूप महत्त्व आहेच तसेच  तुळशी मातेची पूजाही  केली जाते.  तुळशीला त्याच्या असंख्य आरोग्य फायद्यांसाठी औषधी वनस्पतींची राणी म्हणून ओळखले जाते. या वृक्षाला आयुर्वेदातही  खूप महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही हळदीकुंकू समारंभामध्ये तुळशीचे रोप वाण म्हणून दिले असल्याचे आशीर्वाद सोसायटीतील महिला सदस्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top