महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या मतमोजण्यांनंतर मतदारांचा कौल महायुतीलाच मिळाल्याचं पहायला मिळाले. 288 जागांपैकी 235 जागा मिळवत राज्यात महायुतीनं विजयाचा गुलाल उधळला.

महाविकास आघाडीला 50 चा आकडाही ओलांडला आला नाही. मराठवाड्यातही महाविकास आघाडी धारातिर्थी पडल्याचं दिसून आलं. मराठवाड्यातील 46 मतदारसंघांपैकी 40 जागांवर महायुतीच ‘लाडकी’ ठरल्याचं समोर आलं आहे.

तर, मराठवाड्यामध्येही मनोज जरांगेंची ताकद असताना, त्यांचा सुफडा साफ हा पॅटर्न चालला नसल्याची चर्चा आता महायुतीच्या नेत्यांमध्ये रंगली आहे.
