महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हॅट्रिक केली आहे. भाजपला पुन्हा एकदा सर्वात जास्त मतं मिळाले असून, महायुतीला एकत्र 234 जागांवर विजय मिळाला आहे.

1990 नंतर भाजपने तिसऱ्यांदा 100 हून अधिक जागा जिंकल्या असून, या विक्रमामुळे भाजप एकमेव पक्ष म्हणून ठरला आहे. नव्या सरकारचा शपथविधी 25 तारखेला होणार असल्याची माहिती आहे.

शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्याची योजना महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत असल्याची चर्चा आहे.
