नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

“आम्ही गुन्हेगार नाही… कामोठ्याच्या सामान्य नागरिकांची हाक!”सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून अवाजवी दंडाविरोधात नागरिकांचं निवेदन…

कामोठे : 8 ऑगस्ट (4K समाचार )”हेल्मेट विसरलं, पण काय त्या एका चुकेसाठी हजारोंचा दंड योग्य आहे का?” हा प्रश्न विचारत आज कामोठ्यातील अनेक सामान्य नागरिकांनी आपल्या वेदना प्रशासनापर्यंत पोहोचवल्या.


कामोठे सेक्टर १९/२० येथील विस्टा कॉर्नर चौकात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून, मागील काही काळात हेल्मेट न वापरणे किंवा किरकोळ वाहतूक नियम उल्लंघन केल्याच्या कारणावरून हजारोंच्या संख्येने दंड लावण्यात आले. या अवाजवी कारवाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर निघालं की भीती वाटते — कॅमेरा दिसला की काळजाचा ठोका चुकतो.
“सुरक्षिततेसाठी कॅमेरे लावा, पण आम्हाला गुन्हेगार ठरवू नका,” असं म्हणत आज कामोठ्याच्या रहिवाशांनी कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. अजय भोसले आणि ट्रॅफिक हवालदार पाटील साहेब यांची भेट घेतली. या भेटीत विस्तृत चर्चा करत नागरिकांना सवलत द्यावी, अशी मागणी त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली.



ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांचे पालक, नोकरदार वर्ग… सर्वसामान्यांच्या तोंडून आज एकच आवाज होता – “आम्ही कायद्याचे पालन करू, पण अन्यायकारक दंड नको!”

यावेळी वरिष्ठ निरीक्षक श्री. अजय भोसले यांनी याबाबत सकारात्मक आश्वासन दिलं. त्यांनी सांगितलं की, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून लावल्या जाणाऱ्या दंडामध्ये कामोठेतील स्थानिक नागरिकांना लवकरच सवलत देण्याचा विचार केला जाईल.
या ऐक्य आणि न्याय्य मागणीच्या लढ्यात सहभागी असलेले रहिवासी होते – श्री. सुनील करपे, अ‍ॅड. समाधान काशीद, श्री. सुरेश खरात, श्री. दत्तात्रय निकम, श्री. रंगनाथ कोरडे, श्री. बापू साळुंखे, श्री. तानाजी कोनुरे, श्री. निलेश चिकणे, श्री. तात्या घाडगे, श्री. तनवीर डफेदार, आणि श्री. रोहित तांबे उपस्थित होते.
कामोठ्याच्या रस्त्यावरचा हा लढा हेल्मेटविरुद्ध नाही, तर अन्यायाविरुद्ध आहे – प्रशासनाकडून न्याय मिळेल, या आशेवर आज सारे उभे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top