नवीन बातम्या
Gutenberg Times: The WordPress 7.2 release squad, WordCamp World, Playground meets WebMCP, and more—Weekend Edition 376
शेकाप व एकता असोसिएशनतर्फे आयुष्मान भारत, आभा कार्ड नोंदणी शिबिर २५० नागरिकांनी घेतला लाभ
महिला संघटन मजबूत करण्यावर निधी शिंदे यांचे मार्गदर्शन
गणेशोत्सवात वाहतुकीचे नियोजन; अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर पनवेल बाजारपेठेत कोंडी टाळण्यासाठी निर्बंध; ७० कर्मचारी, सात अधिकारी तैनात
श्रावणाच्या साजाला फॅशनचा तडका
‘द रॉयल-श्रावण व्होग’मध्ये कलागुणांचा जल्लोष
सिडकोच्या नोटिसांबाबत कायदेशीर लढ्याची तयारी
सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनीची बैठक संपन्न
बदलत्या भारताच्या शिक्षणाची नवी दिशा ठरणार
‘द स्कुल्स ऑफ इंडिया समिट २०२६’चे खोपोलीत आयोजन
Mumbai-3 September 2026(Ajit Mohite) RBI Dy Governor Addr at CII NBFC and HFC Summit
करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींची चालना!
पुढील तीन महिन्यांत विकासकामांना सुरुवात; मच्छीमारांच्या प्रश्नांना प्राधान्य

*सरगम लायन्स तर्फे विशेष मुलांच्या शाळेमध्ये गुरुपौर्णिमा साजरी*

4kNews कामोठे दि. 29
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधुन लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे रोटरी संचालित विशेष मुलांच्या शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी वर्ग यांना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मान पत्रामध्ये गुरुची महती सांगणारी मानदा पंडित यांनी लिहिलेली सुंदर कविता होती. यावेळी व्यासपीठावर सरगम क्लबचे अध्यक्ष आदित्य दोशी, शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शैला बंदसोडे, सरगम क्लबच्या सचिव मानदा पंडित, प्रोजेक्ट चेअरमन स्वाती गोडसे हे होते. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ शिक्षिका अरुंधती बंदसोडे यांनी केले. सरगम क्लबचे अध्यक्ष आदित्य दोशी यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू सांगुन सरगम क्लबच्या कार्याची माहिती दिली आणि भविष्यात शाळेतील विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यासाठी उपयुक्त कार्यक्रम घेणार असल्याचे सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका शैला बंदसोडे यांनी या सत्काराबद्दल सरगम लायन्स क्लबचे आभार मानले. या हृद्य सत्काराबद्दल सर्व शिक्षक आणि कर्मचारी अतिशय भारावून गेले होते. याप्रसंगी सन्मान मूर्ती शिक्षकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. 


स्वाती गोडसे यांनी हा सन्मान सोहळा आयोजित करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व शिक्षक, कर्मचारी आणि शालेय कमिटीचे आभार मानले.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा सरगम क्लबच्या वतीने बिस्किटे वाटण्यात आली.
या कार्यक्रमाला सरगम क्लबचे संजय गोडसे, प्रेमेंद्र बहिरा, सुनील देशपांडे, संध्या महानुभाव, दीपेश नवधरे आणि रोटरी विशेष मुलांच्या शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top