नवीन बातम्या
पनवेलमध्ये भाजपची सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांची संघटनात्मक बैठक संपन्न! ; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी पक्षकार्याचा आढावा; संघटनात्मक बळकटीकरणावर भर
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह मान्यवरांकडून भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट!
विहिरी-बोअरवेलचे सर्वेक्षण, भूजल पुनर्भरण आणि प्रभागनिहाय जलसुरक्षा आराखडा तयार करण्यासाठी राजेंद्र शर्मा यांचे महापौर आणि आयुक्तांना निवेदन
हायकल कंपनीतील कामगारांना दरमहा २० हजारांची पगारवाढ; जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या करारामुळे विविध सुविधांचा लाभ!
पनवेलमध्ये स्वर्णमेघ ज्वेलर्सचा शुभारंभ; नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन!
ए-टाईप परिसरात दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; जलवाहिनी सर्वेक्षणाची मागणी पाण्याचे प्रयोगशाळेत परीक्षण करून अहवाल सादर करण्याची नगरसेविका अस्मिता घरत यांची मागणी
शेल इंडिया कंपनीतील कामगारांना दरमहा १३ हजारांची पगारवाढ! जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या यशस्वी प्रयत्नांना मोठे यश; वैद्यकीय विमा, बोनससह विविध सुविधांचा लाभ
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधातील गेट बंद आंदोलन स्थगित  १९ स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याचे कंपनी प्रशासनाचे आश्वासन; अजित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश
मास्टर मरीन मेहेर यार्ड -खोपटे कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन !

ए-टाईप परिसरात दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; जलवाहिनी सर्वेक्षणाची मागणी पाण्याचे प्रयोगशाळेत परीक्षण करून अहवाल सादर करण्याची नगरसेविका अस्मिता घरत यांची मागणी

4kNews कामोठे दि. 31

पनवेल (प्रतिनिधी) : पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मधील ए-टाईप परिसरात नागरिकांना दूषित व कडवट पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, कावीळसदृश आजारांची प्रकरणेही समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.



या समस्येची दखल घेत नगरसेविका अस्मिता घरत यांनी माजी नगरसेविका वर्षा नाईक व स्थानिक नागरिकांसह सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सिद्धांत सोनवणे यांची भेट घेतली. यावेळी परिसरातील मुख्य जलवाहिनीचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा, तसेच पुरवठा होणाऱ्या पाण्याचे प्रयोगशाळेत परीक्षण करून अहवाल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.



यावर प्रथम जलवाहिनीचे सर्वेक्षण व पाण्याची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार जुनी पाइपलाइन बदलून नवीन जलवाहिनी टाकण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन अधिकारी सिद्धांत सोनवणे यांनी दिले. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळण्यासाठी या समस्येचा कायमस्वरूपी पाठपुरावा करणार असल्याचे नगरसेविका अस्मिता घरत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top