4k समाचार दि. 20
पनवेल तालुक्यातील करजाडे समर्थ अंगण सोसायटी परिसरात एका विवाहित महिलेला दुचाकीस्वार चोरट्यांनी लुटले. सोमवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले.

अनुराधा धोत्रे (२५) असे पीडित महिलेचे नाव आहे. त्या लिफ्ट जवळ उभ्या असताना मागून आलेल्या धक्का देत गळ्यातील मंगळसूत्र खेचून पलायन केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

पनवेल शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक विविध ठिकाणी तपास करत आहे.

.