4k समाचार
पनवेल शहराला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये आयुक्त मंगेश चितळे यांच्या नेतृत्वाची दखल घेत मानवी हक्क संरक्षण फेडरेशनने त्यांचा विशेष गौरव केला आहे. सोमवार, ११ ऑगस्ट रोजी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना सन्मानपत्र प्रदान केले.

या भेटीदरम्यान, फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष अबरार मास्टर – कच्छी यांनी आयुक्तांचे पनवेल शहरासाठीचे महत्त्वपूर्ण योगदान आणि पारदर्शक कार्यप्रणालीची प्रशंसा केली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आयुक्त घेत असलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

या खास भेटीत फेडरेशनने काही महत्त्वाच्या विषयांवर आयुक्तांशी चर्चा केली आणि एक निवेदन सादर केले. यावर आयुक्त चितळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित मागण्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विकास पाटील, सुरज नागे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आयुक्तांच्या या सहभागामुळे पनवेलकरांच्या आशा पल्लवित झाल्या असून, शहराच्या प्रगतीसाठी प्रशासन आणि सामाजिक संस्था यांच्यातील हा समन्वय महत्त्वाचा मानला जात आहे.
