पनवेल, दि.20 (4kNews) ः भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी आज गृहमंत्री अमित शहा यांचा केला पनवेलमध्ये महाविकास आघाडीने जाहीर निषेध केला तसेच धरणे आंदोलन छेडले.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांचा जाहीर निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे मा.आ.बाळाराम पाटील, पनवेल शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, नरेेंद्र गायकवाड,

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख प्रवीण जाधव, नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख, खांदा वसाहत शहरप्रमुख सदानंद शिर्के, कामोठे शहरप्रमुख संतोष गोळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत, मा.सभापती काशिनाथ पाटील, मा.नगरसेवक गणेश कडू, शंकर म्हात्रे, निर्मला म्हात्रे, नरेंद्र गायकवाड, अनिल ढवळे, बबन गोगावले, गणेश खांडगे, संगीता राऊत, शशिकांत बांदोडकर, पराग मोहिते, राज सदावर्ते, राकेश जाधव, सुभाष गायकवाड, शशिकांत वाघमारे आदींसह मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यांनी भाजप सरकारसह बेताल वक्तव्य करणार्या गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध केला.
