पनवेल, दि.24 (संजय कदम) ः दरवर्षीप्रमाणे यंदाही रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे कळी उमलताना… हा मेडीकल प्रोजेक्टसमधील एक अतिशय स्तुत्य उपक्रम तालुक्यातील अनंत पांडुरंग भोईर अनंत पांडुरंग भोईर विद्यालय पारगाव दापोली येथे घेण्यात आला.

इयत्ता 5 वी ते 7 वी तल्या उमलू पाहणार्या या सुंदर अशा कळ्यांना क्लब च्या प्रथितयश स्त्री रोगतज्ञ डॉ.कांचन दिवेकर यांनी सहज सोप्या भाषेत पौगंडावस्था,त्यात होणारे शारीरिक, मानसिक बदल ,मासिक पाळी, सकस आहार,या विषयांवर उत्तम मार्गदर्शन केले. याबद्दल डॉ. कांचन मॅडम आणि उपस्थित सर्व रोटेरिअन्स, अॅन्स यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.

सदर कार्यक्रम प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ.लक्ष्मण आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. त्याचप्रमाणे यावेळी क्लब च्या वतीने मुलींना तीळ आणि गूळ असा पोषक तत्वांनी बनवलेला तिळगूळ वाटून या कार्यक्रमाची सांगता कऱण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात रोटरीयन्स आणि अॅन्स उपस्थित होते.
