पनवेल दि.२३(वार्ताहर): हिंदवी सेनेच्यावतीने महाआरती आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन विरुपाक्ष मंदिरामध्ये बुधवारी केले होते. या कार्यकमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या तसेच आरती करून दर्शन घेतले.

अयोध्या येथील प्रभू राम मूर्ती प्रतिष्ठापना दिवस तसेच पनवेल हिंदवी सेने संघटनेचा प्रथम वर्धापन दिन बुधवारी साजरा झाला या दिनाचे औचित्य सोडून हिंदवी सेनेचे निलेश पाटील आणि परेश मुरबाडकर यांच्या वतीने पनवेल शहरातील वीरुपाक्ष मंदिरामध्ये महाआरती आणि हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, मित्तल पाटील, प्रीतम म्हात्रे, केदार भगत, रुपेश नागवेकर, पत्रकार संजय कदम, विशाल सावंत, प्रकाश वाघे, दिनेश गिल्डा, राकेश ठाकरे, संजय मुरकुटे, ऍड. रुपाली चव्हाण, माधुरी गोसावी, शिल्पा पवार, सुजाता नलावडे, अश्विनी मुरबाडकर, सविता मिश्रा, वैभव आंग्रे, कुणाल जैतपाल, हेमंत अधिकारी, भूषण पोवळे, गिरीश चव्हाण, आकाश भाटी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
