नवीन बातम्या
महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांचा सपत्नीक सत्कार
उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न
विंधणे कोळीवाड्यात ‘एकविरा आई प्रसन्न’ मच्छीमार सहकारी संस्थेची स्थापना
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात पोलिसांचा रूट मार्च
अटल सेतूवरून विघ्नहर्ताची दिमाखदार स्वारी
भव्य महाआगमनाने कामोठे झाले ‘विघ्नहर्तामय’
माँसाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त तळोज्यात आयुष्मान-आभा कार्ड शिबिर
कळंबोलीकर तहानले; सिडकोविरोधात शिवसेना आक्रमक
राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत सी.के.टी. महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक
इनर व्हील क्लब ऑफ पनवेल. डिस्ट्रिक्ट ३१३; सीमेवरील जवानांसोबत रक्षाबंधन

*ऑटो रिक्षा व स्कूटी चोरी करणाऱ्या ०२ सराईत आरोपींना सीबीडी पोलीसांनी केली अटक; २० लाख ४५ हजार किमतीच्या १७ गाड्या केल्या हस्तगत*


पनवेल दि.२३(संजय कदम): पनवेलसह खारघर, कळंबोली, सीबीडी, उलवा, वाशी, नेहरूनगर, बांद्रा , पंत नगर, खार आदी ठिकाणावरून १७ ऑटो रिक्षा व स्कूटी चोरी करणाऱ्या ०२ सराईत आरोपींना सीबीडी पोलीसांनी अटक करून त्यांच्या कडून जवळपास २० लाख ४५ हजार किमतीच्या गाड्या हस्तगत केल्या आहेत.


    ,

सिबीडी पोलीस ठाण्यात फिर्यादी यांची अॅक्टीव्हा स्कूटी का MH 43 AE 6338 ही आयकर कॉलनी, सेक्टर २१/२२. सीबीडी बेलापूर येथून चोरी झाली होती. सदर तक्रार दाखल होताच
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, उपयुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ, यांच्या  मार्गदर्शनाखाली वपोनि संदेश रेवले, पोलीस निरीक्षक अरूण पवार, यांचे देखरेखीत सिबीडी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सपोनि सुरेश डाबरे, पोउपनि विष्णू वाघ, पोहवा पाटील,  पठाण, भोकरे, चव्हाण, पोना बंडगर, वाघ, साबळे, पोशि पाटील, पोशि पाटील आदींच्या पथकाने गुन्हयातील चोरी झालेल्या वाहनाचा व अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना

दिवसरात्र अथक परिश्रम घेवून घटनास्थळ व आजूबाजूचे परिसरातील सुमारे ५० ते ५५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करत अशरफ आलम शेख (वय २१ वर्षे, रा. टाटानगर झोपडपटदी, सेक्टर १०) व त्याचा सहकारी रमजान अब्दुलमतीन शेख उर्फ पापा (वय २२ वर्षे टाटानगर, सेक्टर १०) या २ संशयित आरोपी निष्पन्न केले. या संशयितांचा सदरील गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करून त्यांच्याकडून फिर्यादी यांची अॅक्टीव्हा स्कूटी हस्तगत करण्यात आली. अधिक तपासामध्ये त्यांच्या कडून चोरीच्या १७ गाड्या ज्याची किंमत २० लाख ४५ हजार इतकी आहे त्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top