देश के महापर्व पर देशनिष्ठा,कर्तव्य ओर अधिकार समजना महत्व पूर्ण.. डॉ.शिल्पा (पाठक) ठाकूर
मनुवादी विचारधारा के लोग ४००पार का नारा देणे वाले …सुदाम पाटील

देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खारघर सेक्टर 37 येथील इनामपुरी मैदानात पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने ध्वजारोहण संपन्न झाला. संविधान म्हणजे स्वातंत्र्य, अधिकार, न्याय , समता, बंधुता अशा एक ना अनेक हक्क बहाल करताना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोकशाहीतील महत्त्वपूर्ण लोकोत्सवा क्षणी संविधानिक मूल्यांची महानता जपत जिल्हाध्यक्ष पनवेल शहर काँग्रेस कमिटी सुदाम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे,माजी नगरसेविका शशिकला सिंग,जिल्हा सरचिटणीस डॉ.शिल्पा पाठक ठाकूर तसेच पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र सिंह ,राकेश चव्हाण, लतीफ नालवंड तसेच मनोज बिरादार व जेष्ठ समाजसेवक गजानन पाटील अन्य पदाधिकारी , कार्यकर्ते स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्र व देश भक्ती गीत सादर करून धर्मनिरपेक्षता, एकता अखंडतेचा संकल्प करून भारत माता की जय अश्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांनी सर्व महामानवांना अभिवादन करून त्यांनी केलेल्या त्या बलिदानातून हा राष्ट्र निर्माण झाला असल्याने त्या राष्ट्रासाठी आपण सर्वांनी आपले मतदान खूप विचार पूर्वक करून आपले अधिकार समजावे असे सांगितले.आयोजक डॉ .शिल्पा पाठक ठाकूर यांनी सार्वजनिक ठिकाणी सामूहिक पद्धतीने प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून देशनिष्ठ बाबत सर्वांनी जागृत व्हावे व कर्तव्यनिष्ठ व्हावे असे आव्हान करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत ,सन्मान करून प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व भूखंड उपलब्ध केल्या बद्दल समाजसेवक गजानन पाटील व सहकाऱ्यांच्या आभार मानले.
