4k समाचार 1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची उलटगणती सुरू झाली असून, ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य उद्घाटन होणार आहे. त्यासाठी शासनाकडून परिसरात दिशादर्शक फलक लावण्याचे काम वेगात सुरू आहे. मात्र, विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा एकदा जोरदारपणे पुढे केली आहे.
ही मागणी पूर्ण होईपर्यंत कोणताही फलक लावू देणार नाही, अशी भूमिका घेत प्रकल्पग्रस्तांनी नेरूळ सेक्टर १८ येथील पामबीच सिग्नलवर लावलेला विमानतळाचा फलक काढून टाकत निषेध नोंदवला. या कृतीमुळे उद्घाटनापूर्वीच वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
