नवीन बातम्या
तिबेटी बांधवांचे मुंबईत चीनच्या नव्या जातीय एकात्मता धोरणाविरोधात तीव्र आंदोलन
तिबेटी बांधवांचे मुंबईत चीनच्या नव्या जातीय एकात्मता धोरणाविरोधात तीव्र आंदोलन
तिबेटी भाषा, संस्कृती आणि धार्मिक ओळख धोक्यात; भारतात तिबेट हाऊस स्थापन करण्याची मागणी
समाजसेवेच्या व्यापक उद्देशाने ‘केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशन’ची स्थापना
रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
यू बिझनेस मिट यांच्यावतीने इंडो-थाई बिझनेस कॉरिडोर चे उद्घाटन
क्रॉस बाँड्री बिझनेस संधी प्राप्त करण्याकरिता आणखीन एक पाऊल
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम करंजाडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आनंद द्विगुणित..

साहित्य, कविता आणि सन्मानाचा संगम; पनवेलमध्ये ‘स्नेहबंध’ प्रकाशन सोहळा संपन्न
WordPress.org blog: WordPress 7.1 Release Candidate 1
WPTavern: #228 – Priscilla Collado Ramirez on Reducing WordPress Beginner Anxiety

आमदार विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमतींमध्ये १० टक्के कपात




4kNews दि. 15
नवी मुंबई/पनवेल प्रतिनिधी — सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे मिळावीत, यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. सिडकोकडून उभारण्यात येणाऱ्या LIG (कमी उत्पन्न गट) आणि EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) प्रवर्गातील घरांच्या किमतींमध्ये १० टक्के दरकपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने जाहीर केला आहे. 



सिडकोच्या घरांच्या वाढलेल्या किमतींमुळे सामान्य व मध्यमवर्गीय नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात आमदार विक्रांत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला होता. अवास्तव दरांमुळे सर्वसामान्य नागरिक घरांच्या स्वप्नापासून दूर जात असल्याचे त्यांनी ठळकपणे मांडत, दरकपातीची मागणी सातत्याने लावून धरली होती.
आमदार पाटील यांच्या या लढाऊ पाठपुराव्याची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेत LIG आणि EWS घरांच्या किमतींमध्ये १० टक्के कपात जाहीर केली. हा निर्णय ‘हाऊसिंग फॉर ऑल’ या केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी धोरणाला अधिक बळ देणारा ठरणार आहे. 

या निर्णयामुळे नवी मुंबई, पनवेल आणि परिसरातील हजारो लॉटरी धारक व घरखरेदीस इच्छुक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरकपातीमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरायला मदत होणार असून, सिडकोच्या घरांसाठीची मागणी वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.या निर्णयाबद्दल आमदार विक्रांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत, “सर्वसामान्य माणसाच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरेल,” अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, लॉटरी धारक नागरिकांनी आमदार विक्रांत पाटील यांच्या या यशस्वी लढ्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top