नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे ‘ऑरेंज द वर्ल्ड’ मोहिमेअंतर्गत जनजागृती उपक्रमांचे आयोजन

4kNews दि. 15

पनवेल (प्रतिनिधी) संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुरस्कृत ‘ऑरेंज द वर्ल्ड’ या आंतरराष्ट्रीय मोहिमेअंतर्गत इनरव्हील क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने नवीन पनवेल येथील सी. के. टी. विद्यालयात इयत्ता ९वी व ११वीच्या विद्यार्थिनींसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.



कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालय प्रशासनातर्फे इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा अॅड. सुनिता जोशी यांनी ‘ऑरेंज द वर्ल्ड’ मोहिमेचे महत्त्व, महिलांचे हक्क, सुरक्षितता तसेच महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची भूमिका याविषयी विद्यार्थिनींना सविस्तर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींसाठी पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम आणि ज्युनिअर कॉलेज अशा तीन विभागांतून प्रत्येकी तीन विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. उत्कृष्ट पोस्टर सादर करणाऱ्या विद्यार्थिनींना इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



यावेळी “स्त्रियांवरील हिंसाचार थांबवा” या संदेशासाठी विद्यार्थिनी, शिक्षिका तसेच इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी ऑरेंज रंगाच्या फिती परिधान करून, हातात जनजागृतीपर पोस्टर्स घेत विद्यालयाबाहेरील परिसरात जनजागृती फेरी काढली. या फेरीद्वारे महिलांवरील हिंसाचाराविरोधात समाजात सकारात्मक संदेश देण्यात आला. या कार्यक्रमास जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालिका वर्षा ठाकूर, इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या अध्यक्षा शुभांगी पिंपळकर, सेक्रेटरी डॉ. अमृता नाईक तसेच इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्या इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा जनजागृती मोहिमा सातत्याने राबविण्याची गरज व्यक्त केली.महिलांवरील हिंसाचाराविरोधात समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे आणि तरुण पिढीमध्ये समानता, सन्मान व सुरक्षिततेचे मूल्य रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top