नवीन बातम्या
खारघरवासीयांच्या आग्रहास्तव रंगणार ‘दिवाळी संध्या’!
गायिका आर्या आंबेकर यांच्या सुरेल गीतांची मैफल; कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य
माझं पनवेल’ हे नावच पनवेलकरांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करते – रामशेठ ठाकूर
माझं पनवेल’च्या १३व्या दिवाळी विशेषांकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
चांगू काना ठाकूर महाविद्यालयात ‘दिवाळी बाजार’ उत्साहात  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि उद्योजकीय कौशल्यांना मिळाले व्यासपीठ
माईंडस्पेस फ्युजनच्या ‘फेस्टिव्ह बाजार’ला ५ हजारांहून अधिक नागरिकांची भेट खरेदी, खाद्यपदार्थ, संगीत आणि कलाविष्कारांनी दोन दिवसीय महोत्सवात रंगत
संतोष भगत यांच्याकडून यंदाही मुलांना फटाक्यांचे वाटप
फटाके भेट देत चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद
दिवाळीचा आनंद साजरा करा, पण सुरक्षिततेला प्राधान्य द्या!  घरफोडी, चोरी आणि सायबर फसवणूक टाळण्यासाठी कामोठेकरांनी सतर्क राहावे; वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांचे आवाहन
महिनाभरात पैसे दुप्पट करण्याचे आमिष; चार जणांना ७२.९८ लाखांचा गंडा उरणमधील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल
औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेला वेग; ऑक्टोबरमध्ये ५४४ नियामक कारवाया
११ ठिकाणी छापे; १.३४ कोटींचा औषधे व सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, चौघांना अटक
WordCamp Central: A Shoutout to Meahadi Hasan: From the Classroom to the Global WordPress Community

कळंबोली माध्यमिक शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा व स्वप्नील लावंड चा सन्मान सोहळा उत्साहात

4kNews दि. 15
मनोज पाटील (प्रतिनिधी)
सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक अंतर कुल क्रीडा स्पर्धा व या विद्यालयाचा स्वप्नील किशोर लावंड या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. 


 सुधागड माध्यमिक शाळा शाळांतर्गत व शाळाबाह्य विविध  स्पर्धांमध्ये नेहमी अग्रेसर असते. या वर्षी सुधागड माध्यमिक शाळेचा विद्यार्थी कु. स्वप्नील किशोर लावंड या विद्यार्थ्यांने १४ वर्षाखालील ७५ किलो वजनी गटात सिंधुदुर्ग येथे झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धसाठी निवड झाल्याबद्दल कळंबोली शहरात भव्य मिरवणूक काढून स्वप्नील लावंड चा शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. 


 या वेळी शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांनी स्वप्नील च्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करून त्याच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हा पनवेल प्रमुख रामदास शेवाळे, माजी नगरसेवक विजय खानावकर, रविंद्र भगत,बबन मुकादम,विजया कदम,अजय सुर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते.
   या वेळी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून वार्षिक अंतर कुल क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.या सर्व स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे, पर्यवेक्षक पुनम कांबळे, लक्ष्मण मगरे पाटील, भगवान खेडकर, क्रीडा शिक्षक विलास पाटील, विकास नाईक, फीरोज सय्यद, पियुष सदावर्ते तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी प्रयत्नशील आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top