नवीन बातम्या
*राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने फिरते लोकन्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर यशस्वीरीत्या संपन्न*
शिवसेना उरण विधानसभा पनवेल तालुका सभा संपन्न
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नवीन पनवेल शहर शाखेच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
हिंदु संस्कृती जपण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून शिवशक्ती मित्र मंडळामार्फत केले जात आहे ः रायगड भूषण रमेश गुडेकर
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी क्रांती स्तंभास अभिवादन
*पत्रकार संजय कदम यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने देण्यात आला “शांतता आणि संघर्ष निवारण पुरस्कार*
सिडको ठेकेदारी सुरक्षा रक्षकांना रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये वर्ग करुन घ्या
हिन्द मजदूर किसान पंचायतचचे सामुहिंक आंदोलन
तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त केलेल्या वाहनांचा होणार जाहीर लिलाव
*केएलई कॉलेजमध्ये राष्ट्रीय कायदा महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन*

फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा – एंजेल वनचे आवाहन

नवी मुंबई/पनवेल (प्रतिनिधी) फिनटेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी एंजेल वन लिमिटेडने एंजल वनच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या तसेच त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे वापरून तोतयागिरी करणाऱ्या फसव्या सोशल मीडिया गटांच्या वाढत्या व्याप्तीबद्दल गुंतवणूकदारांना सतर्क करत असून एंजेल वनशी संबंध असल्याचा खोटा दावा करून, सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अनेक अनधिकृत गट तयार होत असल्याचे या कंपनीच्या निरीक्षणात आले आहे.    

    आवश्यक सेबी नोंदणी/परवानगीशिवाय सिक्युरिटीजशी संबंधित सल्ला किंवा शिफारसी प्रदान करणे, तसेच सेबी च्या मंजुरीशिवाय सिक्युरिटीजशी संबंधित परतावा आणि कामगिरीबद्दल अनधिकृत दावे करणे, अशा बेकायदेशीर गोष्टींमध्ये हे फसवे गट गुंतले आहेत, हे एंजेल वनने ओळखले आहे.   व्हॉट्सॲप आणि टेलीग्राम ग्रुप एंजल वन लिमिटेडचे ब्रँड नाव आणि लोगो तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे आणि प्रतिमा यांचा बेकायदेशीरपणे आणि भ्रामकपणे गैरवापर करत आहेत.

आणि ते एंजल वन लिमिटेडशी संबंधित आहेत असा विश्वास ठेवत सर्वसामान्यांची दिशाभूल करत आहेत. “अनधिकृतरित्या गुंतवणुकीचा सल्ला देणे किंवा सिक्युरिटीज मार्केटमध्ये परताव्याची हमी देणे हे कायद्याने निषिद्ध आहे. त्यामुळेच आम्ही गुंतवणूकदारांना योग्य ती माहिती घेण्यास तसेच आमच्या संस्थेकडून व्यवहार झाल्याचा किंवा माहिती मिळाल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही घटनेची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन केले आहे.

  कायदेशीर गुंतवणुकीचे निर्णय नेहमी सखोल संशोधन आणि अधिकृत स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित असावेत. एंजेल वन लिमिटेडचा कोणत्याही बनावट ॲप्लिकेशन्स, वेब लिंक्स किंवा खासगी व्हॉट्सॲप/टेलीग्राम ग्रुप्सशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही संबंध नाही आणि फसव्या ॲप्लिकेशन्स किंवा वेब लिंक्सच्या व्यवहारामुळे होणाऱ्या कोणत्याही आर्थिक नुकसानासाठी किंवा परिणामांसाठी ते जबाबदार राहणार नाहीत, असे एंजेल वनने म्हटले आहे. एंजेल वन गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि सुरक्षित व्यापार पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. सर्व गुंतवणूकदारांना सतर्क राहण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी कंपनी प्रोत्साहन देते.अशा संस्थांशी जोडले जाऊ नका, तसेच कोणत्याही संशयास्पद गोष्टींची माहिती त्वरित कायदेशीर यंत्रणांना द्या, असा सल्ला जनतेला दिला जातो. तुम्हाला कोणतेही संभाव्य घोटाळे आढळल्यास, ते सायबर क्राईम पोर्टलद्वारे cybercrime.gov.inतसेच १९३० या हेल्पलाइन वर कॉल करून किंवा तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला भेट देऊन नोंदवले जाऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top