नवीन बातम्या
उरण नगरपरिषदेत वारस हक्काने १९ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती. २ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांच्या प्रयत्नामुळे मार्गी.
*सरगम लायन्स तर्फे तळोजा प्राथमिक शाळेत वाचनालय*
अभिनेते विकास वायाळ यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या महाराष्ट्र प्रवक्तापदी निवड
क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांचा रोटरीतर्फे सन्मान
शिक्षक-पालक संघाची स्थापना; मानसी कोकीळ, मनीषा पाटील अध्यक्ष
पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
सिडको अग्निशमन केंद्र खारघर  रेस्क्यू  वर्दी
संतोष पवार यांची पनवेल शहर जिल्हा काँग्रेस एससी विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन

गुरुवारपासून उलवा नोडमध्ये ‘नमो चषक’ 

पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने दिनांक २३, २४ व २५ जानेवारीला उलवा नोडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘भव्य क्रीडा महोत्सव’ अर्थात ‘नमो चषक २०२५’ चे स्पर्धेचे उदघाटन गुरुवार दिनांक २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.


   उलवा नोडमधील सेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या पाठीमागील बाजूच्या मैदानावर होणाऱ्या या नमो चषकचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, विधानपरिषद आमदार विक्रांत पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, नमो चषकाचे मुख्य आयोजक व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर,

भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष सुनील राणा, भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोठे अध्यक्ष रविंद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रविण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, उलवे नोड अध्यक्ष अमर म्हात्रे, उलवे १ अध्यक्ष निलेश खारकर, उलवे २ अध्यक्ष विजय घरत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे.
 

या क्रीडा महोत्सवात राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, खो-खो, कबड्डी तसेच धावणे, भाला फेक, थाळी फेक, गोळा फेक, कीड व्हेलीन थ्रो, हातोडा फेक या अ‍ॅथलेटीक्स स्पर्धा होणार असून या स्पर्धेत पाच हजारपेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग असणार आहे. राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा २३ जानेवारीला, कबड्डी २४ तर खो-खो २५ जानेवारीला आणि या तिन्ही प्रकारच्या स्पर्धा प्रकाश झोतात तर धावणे, भाला फेक, थाळी फेक, गोळा फेक, कीड व्हेलीन थ्रो, हातोडा फेक या अ‍ॅथलेटीक्स स्पर्धा तीनही दिवस दिवसा होणार आहेत. या स्पर्धेतील राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील एकूण विजेत्यांना ०७ लाख ५६ हजार रुपये, खो-खो मधील एकूण विजेत्यांना ०१ लाख ४३२०० रुपये, कबड्डी स्पर्धेतील मधील एकूण विजेत्यांना ०१ लाख ८१ हजार रुपये तर अ‍ॅथलेटीक्स स्पर्धेतील एकूण विजेत्यांना ०४ लाख ११ हजार रुपये अशी एकूण तब्बल १४ लाख ९१ हजार २०० रुपयांची रक्कम आणि चषक देऊन सन्मानित करण्यात येणार असून विजेत्या खेळाडूंना भरघोस रक्कमेची बक्षिसे असतानाही विनामूल्य प्रवेश या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्ये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top