4k समाचार दि. 20
नवी मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने शिवसेना (ठाकरे गट) तर्फे नवी मुंबईतील नेरुळ येथे पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत नागरिकांनी सहभाग घेतला. सहभागी नागरिक व विद्यार्थ्यांना मातीपासून गणेश मूर्ती कशा तयार कराव्यात याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

या उपक्रमाबाबत आयोजक प्रकाश पाटणकर यांनी माहिती देताना सांगितले की, “गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडू मातीच्या मूर्तीचं महत्त्व पटवून देणं आणि पर्यावरणाचे रक्षण करणं हेच आमचं मुख्य उद्दिष्ट आहे.”
